तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट हे
लालबाग, मुंबई उपनगरातील सर्वात
प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ. भक्तिभावा
बरोबरच राष्ट्रीय द्दष्ट्या जनजागृतीचे
स्वरुप ह्या उत्सवाला लोकमान्य
टिळकांनी दिले त्यांच्याच प्रेरणेने तेजुकाया
सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट गेली ४३ वर्षे
हा उत्सव गुण्यागोंविद्याने साजरा करत
आहे.
मागील वर्षांमध्ये अनेक
थोरा-मोठ्यांचे सहकार्य आम्हाला लाभले.
त्यामध्ये तेजुकायाचे मालक आदरणीय श्री. प्रमोदकुमार व कांतीलाल तेजुकाया, मुर्तीकार श्री. राजन झाड, आणि ट्रस्टचे संस्थापक श्री. आबा तावडे ह्यांचे विशेष आभार. तसेच या गणेशोत्सवास अनेक वर्गणीदार, जाहिरातदार, हितचिंतक यांचे भरपूर आर्थिक सहकार्य लाभले तसेच बी.ई.एस.टी.,काळाचौकी पोलीस ठाणे, महानगरपालिका इ. संस्थांचे कायदेशीर सहकार्य लाभले. त्यांचेसुध्दा मनापासुन आभार. यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा आम्ही बाळगतो.

